
गुणवत्ता आणि क्षमतेची कवचकुंडले असली तरी शेवटी सर्व खेळ आकडेवारीचा असतो. ऐन परीक्षेत तुम्ही कच खाल्ली तर अंगी असलेल्या हुशारीचा काहीच फायदा नसतो, शेवटी प्रगतिपुस्तकावरील लाल शेराच तुमची पायरी सिद्ध करतो. हेच भारतीय क्रिकेट टीममधील काही मोहऱ्यांबाबत लागू होते.