मीराबाईला आता जग जिंकायचेय!

पॅरिस ऑलिंपिकनंतर वर्षभर विश्रांती घेतलेल्या मीराबाई चानूने राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकत दमदार पुनरागमन केलं असून, जागतिक अजिंक्यपदात पदक जिंकण्याचं लक्ष्य तिने ठेवले आहे.
"From Setback to Comeback: Mirabai Chanu Strikes Gold!"

"From Setback to Comeback: Mirabai Chanu Strikes Gold!"

Sakal

Updated on

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com

टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला विभागातील ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाई चानू हिने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. पॅरिस ऑलिंपिकनंतर विश्रांती व दुखापतीमुळे ती जवळपास एक वर्ष या खेळापासून दूर राहिली. यादरम्यान नव्या नियमामुळे तिचा वजनी गटही बदलला. तरीही भारताच्या या सुवर्णकन्येने राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरत आपल्यामध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक पटकावण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. याच पार्श्वभूमीवर मीराबाई चानू हिच्याशी संवाद साधण्यात आला. तिने यंदा ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक पटकावण्याचे ध्येय बाळगले असल्याचे आवर्जून सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com