

Rahul Gandhi
esakal
चर्चा टाळण्यासाठी तांत्रिकतेचा आधार घ्यायचा प्रयत्न केला जातो. तसंही संसदेतील कामकाजाच्या नियमांचे जाणकार सांगतात, की कोणतंही पुस्तक, वृत्तपत्र यातील मजकुराचा दाखला संसदेत तो कामकाजाशी सुसंगत असेल, तर देता येतो. राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. साहजिकच त्यात सगळ्या विषयांचा समावेश असतो. तांत्रिकदृष्ट्या राहुल गांधी यांनी प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील भाग संसदेत वाचण्याचा प्रयत्न केला ते नियमानुसार आहे का, यावर मतभेद होऊ शकतात. मात्र अशी चर्चा का झोंबते याचं कारण राजकीय आहे.