K C Pande in news jersey
K C Pande in news jerseyesakal

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता...

Published on

लेखक : के.सी. पांडे

गणेशोत्सव आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. लोकांनी सामाजिक, धर्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र यावे, या उद्देशाने सुरू झालेल्या या उत्सवाचे आजचे रूप पाहता लोकांना एकत्र करण्यासाठी नव्हे, तर श्रीगणेशाची आराधना करण्यासाठी एवढा मोठा समूह एकत्र होतो, हेच आश्‍चर्य आहे. कोणत्याही विघ्नांपासून वाचविणाऱ्या या गणाधिपतीच्या उत्सवानिमित्त तरुणांनीही भक्ती व अध्यात्माचा स्वीकार करत इतरांनाही या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे.

गारगोटी व ईश्वरभक्ती हे परस्परपूरक आहेत. जगभरात मिनरल क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये गारगोटी सर्वोच्च स्थानी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गारगोटीच्या वाटचालीत ईश्वरभक्ती विनाखंड बरोबर राहिली आहे. दोन- अडीच वर्षांत कोरोना महामारीनंतर संपूर्ण जग हादरून गेल्यानंतरही आज पुन्हा एकदा जगाच्या पटलावर गारगोटी सिद्ध झाली आहे.

याचबरोबर ईश्वरभक्ती, भारतीय सण, आपली संस्कृती याबद्दलच्या स्वाभिमानात गारगोटी परिवाराने जगभरात कायम अभिमान बाळगला आहे. यामुळे जागतिक स्तरावरही गारगोटीचे कायम कौतुक होत आहे. गेल्या काही कालावधीत जगातील सर्वच देशांना फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले, यापासून काही गारगोटीही वाचू शकली नाही; पण ‘तूच सुखकर्ता- तूच दुःखहर्ता’ या ओळीप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांचा लाडका श्रीगणेशाच्या भक्तीतून सतत मिळणाऱ्या ऊर्जेमुळेच पुन्हा सर्व स्थिरस्थावर होत आहे. संकटमोचन देवतेच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. (gargoti museum KC Pandey saptarang marathi article on ganeshotsav Nashik Latest Marathi Article)

न्यू जर्सी (अमेरिका) येथील गणपती
न्यू जर्सी (अमेरिका) येथील गणपतीesakal

भारतीय संस्कृती तसेच आध्यात्मिक उपासनेत श्रीगणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात गणपतीची आराधना केली जाते. माझ्या आयुष्यातील ३० वर्षांतील जास्तीत जास्त काळ मी परदेशात होतो. देश-परदेशात विशेषकरून अमेरिकेत अगदी उत्साहवर्धक वातावरणात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो.

गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच सर्व विघ्नांचा हर्ता म्हणूनही सर्वजण त्याच्याकडे आशेने बघतात. गणांचा ईश म्हणजे गणेश, गण हे भगवान शिव आणि देवी पार्वतीचे सेवक होत. गणांचा प्रभू म्हणजे गणांचा अधिपती म्हणून ‘गणपती’ असे नावदेखील गणेश देवतेचे प्रसिद्ध आहे. ‘शिवहर’ व ‘पार्वतीपुत्र’ असाही गणपतीचा उल्लेख केला जातो.

कोणत्याही शुभकार्याची सुरवात करायची असेल, तर ‘श्रीगणेशा’ करणे अशी म्हण प्रसिद्ध आहे. घरगुती किंवा सार्वजनिक मंगल प्रसंग असेल, तर गणेशाचेच नाव आणि प्रतिमा वापरणे शुभ समजले जाते. वक्रतुंड, लंबोदर, विनायक, विघ्नेश्वर, गजानन, गणेश व एकदंत अशी गणपतीची नावे प्रसिद्ध आहेत.

गणेशोत्सव व देशभक्ती यांचाही संबंध इतिहासात आपल्याला दिसतो. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यावे, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली. घरोघरी केली जाणारी गणपतीची उपासना ही सामाजिक स्तरावर ऐक्याचे प्रतीक बनली. तब्बल एक शतकानंतरही गणेशोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. देश-परदेशात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

श्री अक्षरधाम
श्री अक्षरधामesakal
K C Pande in news jersey
पियूची वही, मी आणि माझी आई!
रॉबिन्सनविले, अमेरिका
रॉबिन्सनविले, अमेरिकाesakal

आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे, या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल, तर आपला गणपती ठिकाणावर असला पाहिजे म्हणून गणपतीला प्रथम पूजले जाते. याचा अर्थ असा होतो, की कार्याच्या प्रारंभापूर्वी मनाला शांत व स्थिर करायचे, की ज्याच्यामुळे विघ्न येऊ नये म्हणून व कार्य सरळपणे पार पाडावे, असेही मानले जाते.

आध्यात्मिक जीवन हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय असते. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. ईश्वराप्रति कृतज्ञ भाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या क्रियेमध्ये ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर कमी होते व मी ईश्वररूप आहे, हा आंतरिक भाव प्रकट होतो. मनातील सर्व विचार, विषय, वासना आपोआपच नाहीशा होतात.
भक्ती या आपल्या रोजच्या वापरातील शब्दांमध्ये ‘भज’ असा मूळ संस्कृत धातू आहे.

त्याचा खरा अर्थ वाटून घेणे होय. अगदी आजच्या डिजिटल युगात बोलायचे झाले, तर शेअर करणे असा आहे. एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती सर्व सुख-दुःख आपल्या आराध्याला सांगते, म्हणजेच त्याच्याकडे शेअर करते. दैवीकृपा प्राप्त होण्यासाठी भक्ताची भक्ती ही निष्काम असणे गरजेचे आहे.

निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास सर्वार्थाने अधिक लाभ होऊ शकतो. भक्ती विशिष्ट उपचारांच्या गुंत्यामध्ये शरीराने न अडकता आपण मनाने ईश्वराशी एकरूप झाले पाहिजे, तरच ईश्वर आपल्याला प्रसन्न होईल, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गारगोटीचा जागतिक पटलावरचा प्रवास.

सध्याच्या युवा पिढीने तंत्रज्ञानाचा वापर अवश्य करावा, पण त्याचा उपयोग संशोधनासाठी असला पाहिजे. भारतीय संस्कृती व पुराण कालावधीत देवी-देवतांचे महत्त्व आजही अधोरेखित आहे. त्यामुळे युवा पिढीने भक्ती व अध्यात्म हा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

आम्ही इतके वर्षे परदेशात असूनही आपली संस्कृती, आपले संस्कार या विचारांशी कायम कटिबद्ध राहिलो. युवकांनी भक्ती व अध्यात्माचा स्वीकार करत इतरांनाही या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीने पावल उचलली पाहिजेत.

K C Pande in news jersey
स्मितांकित शोकछाया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com