

General Asim Munir Field Marshal status
esakal
पाकिस्तानमध्ये तिथल्या लष्करशहाने सगळे अधिकार आपल्या हाती घेतले आहेत. न्यायसंस्थाही त्याच्या अधीन राहणार आहे. कुठलाही रक्तपात न करता लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हे सहजपणे घडवून आणलं आहे. धर्मांधतेकडं झुकलेल्या एका जनरलच्या हाती अशी निरंकुश सत्ता येणं ही केवळ पाकिस्तानची अंतर्गत समस्या नाही, भारतीय उपखंडासाठी हा धोका बनू शकतो.