
प्रशांत ननावरे
दादरमध्ये १९२४ मध्ये एकही स्नॅक्सचे दुकान नव्हते, त्याकाळी गोकुळदास गाठीयावालाची सुरुवात झाली. गेल्या वर्षी त्यांनी आपली शंभरी साजरी केली. इतक्या वर्षांत लोकांना काय आवडतं आणि काय नाही, याचा त्यांना चांगलाच अंदाज आहे, म्हणून आजही ताजे आणि वेगळ्या चवीचे पदार्थ विकण्याकडे त्यांचा कल असतो. पॅकबंद पदार्थांसोबत दररोज खाता येतील, असे विविध प्रकारचे ढोकळे, समोसे, कचोरी, अळूवडी, जिलेबी-फाफडादेखील इथे मिळतो. बाहेरचे, तेलकट-तुपकट पदार्थ टाळण्याचा सल्ला हल्ली डॉक्टर देतात; परंतु ज्या ठिकाणचे पदार्थ लोकं शंभर वर्षांपासून खात आहेत, त्यांना इथे दोषी कसं मानायचं, हा खरा प्रश्न आहे.