gear
sakal
भविष्यात चारचाकी वाहनात गिअर टाकताना क्लच पेडलची गरज भासणार नाही, याची कल्पनाही केली नव्हती. मात्र वाहन कंपन्यांनी विविध संशोधन आणि अभ्यासातून ‘क्लच पेडल’ नसलेली वाहने आणली. अर्थात क्लचची जबाबदारी स्वयंचलित प्रणालीवर सोपविली.
या श्रेणीतील वाहनांची लोकप्रियता वाढली. मात्र मॅन्युअल आणि स्वयंचलित यात आणखी एक प्रणाली ‘आयएमटी’ तंत्र अस्तित्त्वात आले. यात पेडल क्लच काढून टाकले तरी गिअरचे नियंत्रण चालकाच्या हाती ठेवले. बजेटचा विचार केल्यास ही वाहने तुलनेने परवडणारी ठरू लागली.