सध्या कोणत्याही प्रवासात सर्वांचाच वाटाड्या असलेला गुगल मॅप मागील काही दिवसांत बराच चर्चेत होता. गुगल मॅपमुळे चुकीच्या रस्त्याने गेलो किंवा एखाद्या ठिकाणचे लोकेशन टाकल्यावर त्याने भलतीकडेच नेले, अशा अनेक घटना आपल्या वाचनात येतात. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सर्वांनाच दिशा दाखवणारा गुगल मॅप स्वतः दिशाहीन का होत असावा, तो काम कसे करतो, त्याच्या चुका मानवनिर्मित आहेत की तांत्रिक इत्यादी प्रश्नांचा घेतलेला वेध...