Premium|Trimbak Fort Victory : खेळाडूंना समजून घेण्याची गरज...

Sachin Tendulkar Greg Chappell : ग्रेग चॅपेलच्या चुका, खेळाडूंचा विश्वास आणि संघातील वातावरणातून गौतम गंभीरने काय शिकायला हवे?
Sachin Tendulkar Greg Chappell

Sachin Tendulkar Greg Chappell

esakal

Updated on

सुनंदन लेले

भारतीय संघाचा सराव बघून, त्याचे निरीक्षण करून त्यातून काही संदर्भ लागतात का हे बघायला मी अहमदाबादच्या मैदानावर हजर झालो होतो. ही घटना आहे २००६ मध्ये घडलेली. भारतीय संघ यायला वेळ असताना १५ मिनिटे अगोदर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल मैदानावर आले म्हणून माझी उत्सुकता वाढली. त्यांनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर येत त्याच्याकडे तोंड करत उलट पावली चालणे चालू केले आणि ते समोरच्या माणसाकडे बघून बोलून काही तरी तपासत होते. एका जागी त्यांनी गोलंदाज करतो तशी बुटांनी खूण केली. माझी उत्सुकता वाढली. थोड्याच वेळात भारतीय संघ दाखल झाला. पाच मिनिटांत ग्रेग चॅपेल संघातील सर्व खेळाडूंना घेऊन आणि सोबत कोणाही बाकी सहायक प्रशिक्षकाला न घेता बरोबर बुटांनी खूण केलेल्या जागी गेले आणि नंतर १० मिनिटे ते सतत तावातावाने भारतीय संघातील खेळाडूंशी बोलत होते.

सराव संपला तरी माझ्या डोक्यातून ग्रेग चॅपेल यांची ती कृती जात नव्हती. मला राहावले नाही म्हणून मी संध्याकाळी वेळ घेऊन सचिन तेंडुलकरला महत्त्वाचे काम आहे असे सांगत जाऊन भेटलो. भेटल्यावर मी सचिनला ग्रेग चॅपेल यांनी आज मैदानावर सरावाअगोदर काय सांगितले? हे विचारता सचिन जरा नाराज झाला कारण संघात काय चर्चा होते हे मी त्याला विचारणे मान्य नव्हते. मी जेव्हा मामला बातमी करायचा नसून अजून गंभीर आहे सांगितले, तेव्हा एका अर्थाने सचिनने नाराजीने मला थोडक्यात सांगितले, की ग्रेग चॅपेल यांनी सगळ्या खेळाडूंना झापडताना, “तुम्ही जास्त हीरोगिरी करून नका… भारतात क्रिकेटला वेगळा स्थान आहे आणि चाहते तुमच्यावर खूप प्रेम करतात म्हणून तुम्ही हीरो आहात हे विसरू नका… तुम्ही त्याच भारतीय क्रिकेट चाहत्यांना देणे लागता… त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा खेळ करणे हे तुमचे कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा,” असे झापताना सांगितल्याचे कळले. मी सचिनला इतकेच म्हणालो, की सचिनला मला या कृतीत जरा शंका येते आहे कारण ग्रेग चॅपेल बुटांनी खूण केलेल्या जागी तुम्हाला नेऊन बोलले आहेत आणि मला शंका आहे की त्यांनी त्यांच्या शर्टला ब्ल्यू टूथ माइक लावून ते बोलणे आणि त्याचे चित्रीकरण नोंदवले आहे, असे मला वाटते. सचिन माझ्या सांगण्याने चपापला होता. नंतर मला म्हणाला, ‘‘नाही रे, उगाच तुला शंका येते आहे.’’ प्रत्यक्षात नंतर हे सिद्ध झाले की ग्रेग चॅपेल यांनी ते बोलणे केवळ त्यांच्या येणाऱ्या डॉक्युमेंटरीसाठी रेकॉर्ड केले होते. ज्याची खेळाडूंना कल्पना नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com