Premium|Old Hindi Film Songs : ‘प्यासा’साठी थांबली वेळही...

Guru Dutt’s Pyaasa: A Timeless Classic : १९५७ हे वर्ष 'मदर इंडिया', 'नया दौर' आणि 'दो आँखे बारह हाथ' यांसारख्या चित्रपटांमुळे गाजले, पण गुरुदत्तचा 'प्यासा' हा साहिरच्या काव्य, एस. डी. बर्मनचे संगीत आणि वहिदाची कहाणी यामुळे जागतिक कीर्तीच्या वलयात झळकत आजही भारतीय चित्रपटांचे अवकाश व्यापून आहे.
Guru Dutt’s Pyaasa: A Timeless Classic

Guru Dutt’s Pyaasa: A Timeless Classic

esakal

Updated on

‘तुम-सा नहीं देखा,’ ‘नया दौर,’ ‘दो आँखे बारह हाथ,’ ‘मदर इंडिया’ यांचा जल्लोष चालला होता. अशा वेळी गुरुदत्तचा ‘प्यासा’ आला आणि बघता बघता भारतीय चित्रपटाचं अवकाश जणू व्यापून गेलं. आजही ‘प्यासा’ जागतिक कीर्तिच्या वलयात झळकत आहे. भारतीय रसिकांच्या तरुण पिढीलाही त्याची भुरळ आहे. ‘प्यासा’ गुरुदत्तचं स्वप्न आहे. साहिरचे हजार प्रश्न आहेत. गुलाबो झालेल्या वहिदाची ती कहाणी आहे. सचिन देव-रफी-जयदेव यांचीही आहे आणि गीता दत्तच्या ओथंबलेल्या स्वरांचीही आहे...

वर्ष १९५७ मध्ये भारतीय सिनेमाची दैनंदिनी अगदी भरून गेलेली आहे. एकेक पानावर एकेक सिनेमा आहे आणि त्या सिनेमाच्या कथाही आहेत. खूप रौचक. काही हृद्य... ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’च्या सोहराब मोदींनी आणखी एक चित्रपट आणला होता- ‘नौशेरखान-ए-आदिल’. चित्रपट पोषाखी म्हणजे कॉस्च्युम ड्रामा होता. १९३५ मध्ये त्यांनी पहिला चित्रपट ‘खून का खून’ आणला होता. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चं हिंदी उर्दू असे रुपेरी पडद्यावरचं रुपांतरण होते. त्यात हॅम्लेटची भूमिका सोहराब मोदींनी केली होती, तर देखणी सुकुमार ओफिलिया झाली होती नसीमबानू. दिल्लीच्या त्या वेळच्या सुप्रसिद्ध गायिका छमियाबाई-त्यांना शमशादही म्हणत-त्यांची सुस्वरूप कन्या रोशनताराला तिने डॉक्टर व्हावं म्हणून दिल्लीच्या इंग्रजी शाळेत पाठवलं खरं; पण तिचे पाय सिनेमाकडे वळलेच. नसीमबानू... आणखी एक ओळख म्हणजे सायराबानूची आई.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com