
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
घरांप्रमाणेच काहींसाठी मोटारदेखील जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला वाटते, आपल्या घरासमोर चारचाकी असावी, मग ती लहान असो किंवा मोठी. अर्थात किंमत पाहून बरेच जण खरेदीचा विचार टाळतात किंवा पुढे ढकलतात; पण हॅचबॅक श्रेणीतील मोटारीने सर्वसामान्यांना खरेदीचे बळ दिले आणि चारचाकी चालविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावला. सर्वांना परवडणारी आणि अगदी अरुंद रस्त्यातूनही सहजपणे जाणारी हॅचबॅक ही अल्पावधीत लोकप्रिय ठरली.