जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पंचांग 10 डिसेंबर 2019 
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941. 

दिनमान : 10 डिसेंबर 2019 

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आर्थिक क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. 

वृषभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभणार आहे. 

सिंह : कर्तृत्त्वाला चांगली संधी मिळणार आहे. आरोग्याची साथ उत्तम राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. धाडसाने पावले टाकाल. 

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी व जुने येणे वसूल होईल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसाय वाढेल. 

धनू : महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मकर : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभणार आहे. 

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

मीन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

पंचांग 10 डिसेंबर 2019 
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 10 December 2019