जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जुलै

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जुलै

आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने नवीन मार्ग दिसतील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. कर्तृत्वाला संधी लाभेल. 

तूळ : प्रगती वेगाने होणार आहे. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. तुमचे अनेक प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात कराल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे आज उरकून घ्यावीत. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आगामी काही महिन्यांचे निर्णय आज घेऊ शकता. 

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

पंचांग
बुधवार : आषाढ शुद्ध 9, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.06, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय दुपारी 1.25, चंद्रास्त रात्री 12.50, भारतीय सौर आषाढ 19, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 10 July 2019