जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 August 2019

पंचांग 12 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. स्वास्थ्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्याकडे लक्ष हवे. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. 

कर्क : हितशत्रुंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती सुधाणार आहे. वैचारिक प्रगती चांगली होणार आहे. 

सिंह : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. तुमच्या वर्तुळात तुमचा प्रभाव राहणार आहे. सहकाऱ्यांकडून फार मदतीची अपेक्षा करू नका. 

कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. 

तूळ : तूळ व्यक्‍तींनी अनुकूल ग्रहमानाचा फायदा करून घ्यावा. नोकरी, व्यवसायात सध्या प्रगतीचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला हवे असे वातावरण लाभणार आहे. 

वृश्‍चिक : नवे स्नेहसंबंध जुळतील. आपली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येईल. सर्व क्षेत्रात वेगाने आगेकूच राहील. 

धनू : साडेसाती चालू आहे. यशासाठी थोडे थांबावे लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

मकर : एखाद्या कामात मानसिक चिंता राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. 

कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीची कामे तूर्त नकोत. जबाबदारी वाढणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. 

पंचांग 12 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 12 August 2019