जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचाग : 12 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

पंचांग १२ फेब्रुवारी २०२०
बुधवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय रात्री ९.४९, चंद्रास्त सकाळी ९.३४, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २३, शके १९४१.

दिनमान
मेष  :
अनावश्‍यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. 

वृषभ : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक अनुकूलता लाभणार आहे.

मिथुन : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन आनंदी राहणार आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कर्क : मनोबल, आत्मविश्‍वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

कन्या : तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

तूळ : अनावश्‍यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्य चांगले राहील.

धनू : आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल.

मकर : अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

कुंभ  : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. प्रवासाचे योग.

पंचांग १२ फेब्रुवारी २०२०
बुधवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय रात्री ९.४९, चंद्रास्त सकाळी ९.३४, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २३, शके १९४१.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horoscope and panchang of 12 february 2020

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: