जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : 13 मे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : 13 मे

आजचे दिनमान 
मेष : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. शासकीय कामात यश मिळेल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. 

वृषभ : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. महत्त्वाचे निर्णय नकोत. मुलामुलींच्या संदर्भात काही नवीन प्रश्‍न निर्माण होतील. 

मिथुन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना पगार वाढीची शक्‍यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढेल. 

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिेसेल. आर्थिक क्षेत्रात काही चांगल्या घटना घडतील. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. 

कन्या : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात फार मोठे यश मिळण्याची अपेक्षा नको. उधारी, उसनवारी वसूल होईल. जबाबदारी वाढेल. 

तुळ : व्यवसायात अतिशय चांगली स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. तुमची अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

वृश्‍चिक : उत्साह व उमेद वाढेल. अडचणीवर मात कराल. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. 

धनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

मकर : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सार्वजनिक कामात यश लाभेल. 

कुंभ : आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी नोंदवू शकाल. अडचणीवर मात कराल. तुमची अपेक्षित कामे होणार आहेत. वैवाहिक सौख्य लाभेल. 

मीन : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे विशेष सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

पंचांग
सोमवार : वैशाख शुद्ध 9, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.03, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय दुपारी 1.42, चंद्रास्त रात्री 1.56, भारतीय सौर वैशाख 23, शके 1941. 

सुविचार 
आजूबाजूची सृष्टी कितीही बदलली, तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही. मात्र, दृष्टी बदलल्यास समाधानी आणि सुखी दोन्ही होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 13 May 2019