जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पंचांग 14 जानेवारी 2020 
मंगळवार : पौष कृष्ण 4, चंद्रनक्षत्र मघा/पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.16, चंद्रोदय रात्री 10, चंद्रास्त सकाळी 10.11, धनुर्मास समाप्ती, भोगी, भारतीय सौर पौष 24, शके 1941. 

दिनमान 14 जानेवारी 2020 
मेष : कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहणार आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. अनेक कामात सहकार्य लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास सुखकारक होतील. सौख्य लाभेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा व आशाआकांक्षा वाढणार आहेत. 

मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. यशासाठी थोडे थांबायला हवे. मित्रांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. 

सिंह : वेगवान प्रगतीचे दिवस आहेत. नोकरीमध्ये बढतीची शक्‍यता आहे. पगारवाढीची शक्‍यता आहे. 

कन्या : शासकीय कामाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. अनेक लोकांचे सहकार्य लाभेल. काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. 

तूळ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. त्याचबरोबर आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. 

वृश्‍चिक : ग्रहमान अत्यंत प्रगतिकारक आहे. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. सत्ता आपल्या हातात ठेवण्याची खटपट कराल. 

धनू : काहींना हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. व्यापारात, व्यवसायात सुधारणा करायला हरकत नाही. मनोरंजनासाठी खर्च वाढणार आहे. 

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. ट्रान्स्पोर्ट, सर्व्हिस स्टेशन या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. तुमचे आर्थिक क्षेत्रातील अंदाज अचूक ठरणार आहेत. 

कुंभ : कुंभ व्यक्‍तींना आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. यश संपादन करू शकाल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. 

मीन : व्यवसायात जबरदस्त अनुकूल वातावरण राहणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. चैनीत जगण्याकरिता पैसा खर्च होणार आहे. 

पंचांग 14 जानेवारी 2020 
मंगळवार : पौष कृष्ण 4, चंद्रनक्षत्र मघा/पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.16, चंद्रोदय रात्री 10, चंद्रास्त सकाळी 10.11, धनुर्मास समाप्ती, भोगी, भारतीय सौर पौष 24, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 14 January 2020