जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 मे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 मे

आजचे दिनमान 
मेष :
शुभ कामासाठी दिवस वर्ज्य आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. 

वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. 

मिथुन : आत्मविश्‍वास वाढेल. मित्रांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामात अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होतील. 

कर्क : जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उधारी, उसनवारी वसूल होईल. जुने येणे वसूल होईल. 

सिंह : व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. 

कन्या : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावयास हवे. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. शासकीय कामात यश मिळेल. 

तूळ : कोणत्याही व्यवहारात धाडस टाळावे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होतील. 

वृश्‍चिक : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मित्रांकडून विश्‍वासघाताची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या व्यव्हारात अडचणी येणार आहेत. 

धनू : कलाकारांना विशेष संधी मिळणार आहे. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

मकर : शासकीय कामात यश लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कुंभ : कर्मचार वर्गाच्या संदर्भात काही नवीन प्रश्‍न निर्माण होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

पंचांग
गुरुवार : वैशाख शुद्ध 12/13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.02, चंद्रोदय दुपारी 4.38, चंद्रास्त पहाटे 4.10, प्रदोष, भारतीय सौर वैशाख 26, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक कुटुंब दिन 

  • 1995 - जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर प्राणवायू व इतर साधनांविना एकटीने चढाई करण्याचा बहुमान ऍलिसन हारग्रिव्हज या ब्रिटिश महिलेने संपादिला. 
  • 2003 - सरदार सरोवर धरणाची उंची शंभर मीटरपर्यंत वाढविण्याच्या कामास प्रारंभ. 
  • 2007 - ब्रिटिशकालीन प्रशासन व्यवस्थेत शेवटचे "आयसीएस' अधिकारी म्हणून काम केलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी रा. कृ. पाटील यांना 2007 च्या राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर. 
  • 2015 : राज्यातील पतसंस्थांनी विमा संरक्षण नसल्याचे स्पष्टीकरण ठेवीदारांच्या पासबुकात व ठेव पावतीवर लेखी नोंदवावे, तसेच त्यासह संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा तपशीलही कार्यालयात फलकावर जाहीर करावा, असा आदेश सहकार आयुक्तांनी दिला. 
Web Title: Horoscope and Panchang of 16 May 2019