जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 मे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 मे

आजचे दिनमान 
मेष :
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. 

वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढेल. 

कर्क : अनेक कामे हातावेगळी करू शकाल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी अधिक खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. 

तूळ : आर्थिक क्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

वृश्‍चिक : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. प्रवासात दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. मौल्यवान वस्तू हरविणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. 

धनू : बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय अचूक ठरणार आहेत. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

मकर : हवी ती संधी लाभणार आहे. नोकरीत कार्यकौशल्या दाखवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. कर्मचारी, वरिष्ठ सर्वांचे सहकार्य मिळेल. दिवस आनंदात जाणार आहे. 

मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. वैवाहिक जीवनात मतभेद वाढणार आहेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

पंचांग
शनिवार : वैशाख शुद्ध 15, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.36, चंद्रास्त पहाटे 5.40, वैशाख स्नान समाप्ती, बुद्ध पौर्णिमा, भारतीय सौर वैशाख 28, शके 1941. 

दिनविशेष 
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 

  • 2004 - पुण्याच्या कृतिका नाडीगने सरस प्रगत गुणांच्या आधारावर तानिया सचदेव आणि एन. राघवी यांना मागे टाकून मुलींच्या 19 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 
  • 2009 - "लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम'चा (एलटीटीई) सर्वेसर्वा व्ही. प्रभाकरन याला श्रीलंकेच्या विशेष कृती दलाच्या सैनिकांनी ठार केल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने जाहीर केले. यात प्रभाकरनचा मोठा मुलगा चार्ल्स अँथनीही ठार झाला. श्रीलंकेतील तमिळींच्या स्वतंत्र देशासाठी (ईलम) शेवटपर्यंत लढणाऱ्या आणि त्यासाठी तीस वर्षांपेक्षा जास्त काळ रक्तरंजित संघर्ष करणाऱ्या वेल्लुपिल्लई प्रभाकरन याचा शेवट अपेक्षेप्रमाणेच झाला. 
  • 2015 - झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुरुमू यांनी शपथ घेतली. 
  • 2015 - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन-हे यांनी यांच्यात सात करारांवर सह्या झाल्या. दोन्ही देशांदरम्यान दुहेरी करपद्धती टाळणे यांसारख्या सात करारांवर सह्या झाल्या. दक्षिण कोरियाने पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटींचा विकास, वीजनिर्मिती आणि अन्य बहुउद्देशीय क्षेत्रांसाठी भारताला 10 अब्ज डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 18 May 2019