esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 एप्रिल
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 एप्रिल

पंचांग 2 एप्रिल 2020 
गुरुवार : चैत्र शुद्ध 9, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय दुपारी 12.58, चंद्रास्त रात्री 1.46, श्रीरामनवमी, गुरुपुष्यामृत (सायंकाळी 7.28 नं. सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर चैत्र 13, शके 1942. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 एप्रिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 2 एप्रिल 2020 : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : दुपारनंतर एखादी आनंददायी घटना समजेल. प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. 

वृषभ : दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. 

मिथुन : उत्साह वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. प्रवासाचे योग येणार आहेत. 

कर्क : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. खर्च कमी होतील. 

सिंह : आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. 

तूळ : आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. व्यवसायात काही अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. 

वृश्‍चिक : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

धनू : दैनंदिन कामे शक्‍यतो सकाळीच करावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी असणार आहे. 

मकर : दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढेल. मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढेल. सौख्य लाभणार आहे. 

कुंभ : आर्थिक कामे होणार आहेत. दुपारनंतर मात्र, काहींना अनावश्‍यक खर्च संभवतो. मानसिक अस्वस्थता राहील. 

मीन : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. मनोबल उत्तम राहील. आनंद राहणार आहात. 

पंचांग 2 एप्रिल 2020 
गुरुवार : चैत्र शुद्ध 9, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय दुपारी 12.58, चंद्रास्त रात्री 1.46, श्रीरामनवमी, गुरुपुष्यामृत (सायंकाळी 7.28 नं. सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर चैत्र 13, शके 1942. 
 

loading image
go to top