esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

पंचांग 2 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान :
मेष : धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचारांचा प्रभाव वाढेल. 

वृषभ : संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मानसिक उत्साह टिकून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

मिथुन : तुमच्याकडे नेतृत्त्व चालून येईल. योग्य मार्गदर्शन करू शकाल. अशक्‍य कामे शक्‍य करून दाखवाल. कामाचा ताण वाढेल. 

कर्क : मानसिक उत्साह वाढणार आहे. नवनवीन आर्थिक मार्ग दिसतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत. 

सिंह : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. 

कन्या : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका व नको त्या ठिकाणी धाडस करू नका. 

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. आर्थिक ओघ कायम राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. उत्साह द्विगुणित होईल. 

धनू : उत्तम वातावरण अनुभवायला मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. 

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखाद्या मित्राकडून विश्‍वासघाताचा अनुभव येईल. सहकार्याची अपेक्षा नको. 

कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दानधर्म कराल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

पंचांग 2 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941. 
 

loading image
go to top