जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 मे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 मे

आजचे दिनमान 
मेष :
प्रवास शक्‍यतो टाळावेत. गूढ गोष्टींकडे ओढा राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येणार आहेत. 

कर्क : संपूर्ण दिवस आनंदात व उत्साहात जाईल. आरोग्य चांगले राहणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

सिंह : गुंतवणुकीला दिवस विशेष चांगला आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : प्रगतीच्या दृष्टीने एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांचे विशेष सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

तूळ : आर्थिक क्षेत्रात परिस्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. 

वृश्‍चिक : आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती आहे. 

धनू : पत्नीसाठी विशेष खर्च करावा लागेल. संततिसौख्य चांगले आहे. तुम्हाला अनेकजण मदत करतील. 

मकर : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. कलाकारांना विशेष यश मिळेल. प्रवासासाठी दिवस चांगला आहे. 

कुंभ : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायात मनासारखी स्थिती राहील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. 

पंचांग
सोमवार : वैशाख कृष्ण 2, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय रात्री 8.28, चंद्रास्त सकाळी 7.10, भारतीय सौर वैशाख 30, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक मधमाशी दिन 

  • 2001 - अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा "चित्रभूषण पुरस्कार' ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, वितरक श्री. ना.य. तथा अण्णासाहेब देऊळगावकर यांना जाहीर. 
  • 2005 - कोल्हापूर येथील मेजर सत्यजित अजितसिंह-शिंदे नेसरीकर जम्मू येथे अतिरेक्‍यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. सातत्याने संवेदनक्षम परिसरात उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना अल्पावधीतच मेजर पदापर्यंत बढती मिळाली होती. 
  • 2015 - खराब रस्त्यांमुळे होणारी हानी पाहता चांगले रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाने केले. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांनी आपल्या हद्दीतील रस्ते आणि पदपथांची देखभाल करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते पार न पाडणाऱ्या चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा इशारा न्यायालयाने दिला. 
  • 2015 - मध्ययुगातील टेराकोट्टा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले आणि देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा लाभलेले पश्‍चिम बंगालमधील विष्णुपूर या शहराला वारसा शहराचा दर्जा देण्याचा पश्‍चिम बंगालच्या पुराणवस्तू संग्रहालयाचा निर्णय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 20 May 2019