जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 जून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 June 2019

मेष : व्यवसाय वाढेल. प्रवास सुखकर होतील. अनेक गोष्टी मनासारख्या होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. स्वास्थ्य लाभेल. मनोरंजनाकरिता खर्च होणार आहेत.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. आरोग्याची चांगली साथ राहणार आहे. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नुकसानीची शक्‍यता आहे. धाडस करण्याची मनोभावना होईल परंतु धाडस टाळावे. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण जाणवेल. जबाबदारी वाढेल. अजून दोन दिवस प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावयाची आहे. कोणावरही विसंबून राहू नका.

सिंह : खर्च योग्य कामासाठी होतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रातील कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक चांगली स्थिती राहणार आहे.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात संधी लाभेल. मनोरंजनाच्या क्षेत्रात विशेष कामगिरी बजावू शकाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.

तुळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभेल. अनेक कामे हातावेगळी करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. वैचारिक व बौद्धिक अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.

वृश्चिक : मनोबल वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. बोलण्यामध्ये संयम हवा. नोकरीत वरिष्ठांची अवकृपा जाणवेल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात फार मोठे यश लाभणार नाही. भागीदारी व्यवसायात कटकटी राहणार आहेत. 

मकर: मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. विरोधकावर मात कराल.

कुंभ : काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. व्यवसायातील गतिमानता टिकून राहणार आहे.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and panchang for 20th June