जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मार्च

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

पंचांग 21 मार्च 2020 
शनिवार : फाल्गुन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय पहाटे 4.49, चंद्रास्त दुपारी 4.29, शनिप्रदोष, भारतीय सौर चैत्र 1, शके 1942. 

दिनमान 21 मार्च 2020 

मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रभाव राहील. कला क्षेत्रामध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. 

वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. तडजोडीची व सामंजस्याची भूमिका राहील. एखादी आनंददायी घटना घडेल. 

मिथुन : तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत रहाल. मनोबल उत्तम राहील. 

कर्क : प्रकृती अस्वस्थता राहील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. 

सिंह : चिकाटीने कार्यरत रहाल. खर्च कमी होतील. मनोबल वाढेल. 

कन्या : अनावश्‍यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल. 

वृश्‍चिक : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवासाचे योग येतील. 

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत रहाल. 

मकर : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम असणार आहे. 

कुंभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. आरोग्य उत्तम राहील. 

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामे रखडतील. प्रकृतीच्या तक्ररीा जाणवतील. 

पंचांग 21 मार्च 2020 
शनिवार : फाल्गुन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय पहाटे 4.49, चंद्रास्त दुपारी 4.29, शनिप्रदोष, भारतीय सौर चैत्र 1, शके 1942. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 21 March 2020