जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मे

आजचे दिनमान 
मेष :
प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 

कर्क : जबाबदारी वाढेल. कामाचे ताणतणाव वाढतील. प्रवासात वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

सिंह : मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. निकटच्या व्यक्‍ती काही समस्या निर्माण करतील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. 

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या संदर्भात सुधारणा होईल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

तूळ : जिद्द व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. मोठी जबाबदारी स्वीकारू नका. 

मकर : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नाट्य क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

मीन : विरोधकावर मात कराल. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे जिद्दीने पार पाडाल. 

पंचांग
मंगळवार : वैशाख कृष्ण 3, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रात्री 9.25, चंद्रास्त सकाळी 8, भारतीय सौर वैशाख 31, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन 

  • 2000 - ताऱ्यांच्या निर्मितीपासून विश्वाच्या निर्मितीपर्यंतच्या असंख्य कोड्यांचा खगोलशास्त्रीय वेध घेण्यासाठी खोडद येथे उभारण्यात आलेली जगातील सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण (जीएमआरटी) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण. 
  • 2002 - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा 'चित्रभूषण पुरस्कार' ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर. 
  • 2009 - पुण्याची धाडसी तरुणी कृष्णा पाटील हिने 19 व्या वर्षात एव्हरेस्ट सर करून सर्वांत कमी वयात एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. 8848 मीटर उंचीच्या या शिखरावर पाऊल टाकणारी ती तिसरी मराठी गिर्यारोहक आणि दुसरीच तरुणी ठरली. 
  • 2015 - प्राचीन सिल्क रोडवरील लव्यापारी तांड्यांचा थांबा असलेल्या ऐतिहासिक पालमिरा शहरावर इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यामुळे जागतिक वारसा यादीतील अमूल्य वास्तूंचे भवितव्य संकटात आल्याचे मानले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 21 May 2019