जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

गुरुवार, 23 जानेवारी 2020 
गुरुवार : पौष कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.22, चंद्रोदय पहाटे 5.44, चंद्रास्त सायंकाळी 5.06, शिवरात्री, भारतीय सौर माघ 3, शके 1941.

दिनांक : गुरुवार, 23 जानेवारी 2020 
आजचे दिनमान 

मेष : मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. तुमचे मनोबल अपूर्व राहील. 

वृषभ : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. 

मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. महत्त्वाच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल. प्रवासाचे योग येतील. 

कर्क : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

सिंह : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील. तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. 

कन्या : सौख्य व समाधान लाभेल. सार्वजनिक कामात तुमचा प्रभाव राहील. मानसन्मान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. 

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभ होतील. 

धनू : अनेक कामात अनुकूलता लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. 

मकर : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना नैराश्‍य जाणवेल. 

कुंभ : मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. 

गुरुवार, 23 जानेवारी 2020 
गुरुवार : पौष कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.22, चंद्रोदय पहाटे 5.44, चंद्रास्त सायंकाळी 5.06, शिवरात्री, भारतीय सौर माघ 3, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 23 January 2020