esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 जुलै

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 जुलै

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : साधूसंतांचा सहवास लाभण्याची शक्‍यता आहे. देवधर्मासाठी खर्च कराल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य चांगले राहील. 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. अनुकूलता लाभेल. 

कर्क : कला क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुरूवर्यांची कृपा लाभेल. 

सिंह : व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. नको त्या गोष्टींवर आपला वेळ वाया घालवू नये. 

कन्या : सुसंधी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे विलंबाने होतील. 

तूळ : प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल. 

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. 

धनू : काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. महत्त्वाची कामे जाणीवपूर्वक करावीत. 

मकर : व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. 

कुंभ : मुलामुलींबरोबर सुसंवाद साधून त्यांचे प्रश्‍न सोडवावेत. वैवाहिक जीवनात कमी-जास्त प्रमाणात समाधानकारक स्थिती राहील. 

मीन : प्रकृती सुधारणा आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. 

पंचांग
मंगळवार : आषाढ कृष्ण 6, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 11.33, चंद्रास्त सकाळी 11.18, भारतीय सौर श्रावण 1, शके 1941. 

loading image