esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

पंचांग 24 ऑगस्ट 2019 
शनिवार : श्रावण कृष्ण 8, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.56, चंद्रोदय रात्री 12.04, चंद्रास्त दुपारी 1.28, गोपाळकाला, भारतीय सौर भाद्रपद 2, शके 1941. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कलाकारांना संधी व प्रसिद्धी लाभेल. 

वृषभ : कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल. मानसिक उत्साह वाढणार आहे. संपूर्ण दिवस आनंदात जाईल. 

मिथुन : कोणत्याही क्षेत्रात विचार करून निर्णय घ्यावेत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

कर्क : दिवस अत्यंत चांगला आहे. उमेद, उत्साह वाढेल. जुने येणे वसूल होईल. 

सिंह : तुमचा दबदबा वाढेल. तुम्हाला जी संधी हवी आहे ती लवकरच मिळेल. धाडसाने कार्य कराल. 

कन्या : प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील. 

तूळ : व्यवसायात जबाबदारी वाढेल. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे. वरिष्ठांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

धनू : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. 

मकर : आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. व्यवसायात नवीन सुधारणा करू शकाल. 

कुंभ : प्रॉपर्टीसाठी, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. लोकांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

मीन : अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आपली कामे एक-दोन दिवसात उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण विशेष वाढणार आहे. 

पंचांग 24 ऑगस्ट 2019 
शनिवार : श्रावण कृष्ण 8, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.56, चंद्रोदय रात्री 12.04, चंद्रास्त दुपारी 1.28, गोपाळकाला, भारतीय सौर भाद्रपद 2, शके 1941. 

loading image
go to top