जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

दिनांक : 25 फेब्रुवारी 2020 : वार : मंगळवार.

आजचे दिनमान 

मेष : दैनंदिन कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. दिवसाची सुरुवात जरी उत्साहवर्धक असली तरी उत्साह कमी असणार आहे. 

वृषभ : नोकरी, व्यवसायात महत्त्वाची कामे व महत्त्वाचे व्यवहार दुपारपूर्वी करावेत. दुपारनंतर काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. 

मिथुन : उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर तुम्हाला स्वास्थ्य लाभेल. चिकाटी वाढणार आहे. प्रवास संभवतो. 

कर्क : दुपारनंतर तुमचे मनाबेल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर होतील. प्रवासाचे योग येतील. 

सिंह : दैनंदिन कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करून घ्यावीत. दुपारनंतर काहींना अनपेक्षित अडचणी संभवतात. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कन्या : मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. खर्च कमी होतील. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. 

तूळ : दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक असेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. अनाश्‍यक खर्च संभवतात. मनोबल कायम ठेवावे लागेल. 

वृश्‍चिक : दिवस आनंदात जाईल. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. 

धनू : सार्वजनिक कामात उत्साहाने कार्यरत राहाल. जिद्द वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

मकर : अपेक्षित गाठीभेटी पडतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कुंभ : आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. मनाबेल उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. दुपारनंतर अचानक गाठीभेटी पडतील. 

मीन : दिवसाची सुरुवात जरी निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचे मनोबल उत्तम राहील. आत्मविश्‍वास वाढेल. 

पंचांग 25 फेब्रुवारी 2020

मंगळवार : फाल्गुन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय सकाळी 8.04, चंद्रास्त रात्री 8.11, भारतीय सौर फाल्गुन 6, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horoscope and panchang of 25 february 2020