esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 जुलै

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 जुलै

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. दुपारपूर्वी काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

कर्क : जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. संततिसौख्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

सिंह : वाहने सावकाश चालवावीत. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कौटुंबिक जीवनातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवणे गरजेचे भासेल. 

कन्या : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाची उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंधांचा व्यवसायामध्ये फायदा होईल. काहींना एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहील. 

तूळ : मनोरंजनाकडे कल राहील. साथीदाराला वेळ देऊ शकाल. वैवाहिक साथीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. 

वृश्‍चिक : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. बौद्धिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

धनू : आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. कोणत्याही कामात घाईगडबड करू नये. 

मकर : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्‍तींना सुयश लाभेल. 

कुंभ : व्यवसायामध्ये नवनवीन उपकरणांवर काम करू शकाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. प्रवासामध्ये वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

मीन : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. वैवाहिक साथीदार, मित्रमैत्रिणी यांचे सहकार्य लाभणार आहे. 

पंचांग 
बुधवार : आषाढ कृष्ण 7, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 11.55, चंद्रास्त दुपारी 12.05, भारतीय सौर श्रावण 2, शके 1941.

loading image