जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै

आजचे दिनमान 
मेष : काहींची कर्ज प्रकरणे मंजूर होतील तर काहींची उधारी व उसनवारी वसूल होईल. गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल. 

वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. 

मिथुन : कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. काहींना गुरूवर्यांचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल. 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. 

सिंह : सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 

कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 

तूळ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. उसने पैसे देवू नयेत. 

वृश्‍चिक : वैवाहिक साथीदाराला वेळ देवू शकाल. साथीदाराशी सुसंवाद साधू शकाल. एखादी सौख्यकारक घटना घडेल. 

धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. वादविवादातील सहभाग टाळावा. 

मकर : प्रवास सुखकर होतील. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विरोधकावर मात कराल. 

कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 

मीन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. 

पंचांग
शनिवार : आषाढ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.26, चंद्रास्त दुपारी 2.43, भारतीय सौर श्रावण 5, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 27 July 2019