जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 जून

आजचे दिनमान 
मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील. 

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात यश लाभेल. खर्च चांगल्या व योग्य कामासाठी होतील. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. 

सिंह : तुमचे व्यवसायातील व आर्थिक क्षेत्रातील निर्णय चुकतील. स्पष्ट बोलण्यामुळे शत्रुत्व ओढवून घ्याल. सांस्कृतिक क्षेत्रात अपूर्व यश मिळेल. 

कन्या : महत्त्वाची कामे नकोत. मित्रांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. विरोधकावर मात कराल. 

तूळ : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : आरोग्य चांगले राहणार आहे. नवीन परिचय होतील. वैवाहिकजीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात काही गोष्टी नव्याने समजतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. साडेसाती चालू आहे. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. भागीदारी व्यवसायात अत्यंत चांगले वातावरण राहणार आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील. 

कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. 

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

पंचांग
शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय रात्री 2.12, चंद्रास्त दुपारी 3.06, भारतीय सौर आषाढ 7, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 28 June 2019