जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 मार्च

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

आजचे पंचांग
शनिवार : चैत्र शुद्ध 4, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.34, सूर्यास्त, 6.48, चंद्रोदय सकाळी 8.58, चंद्रास्त रात्री 10.10, विनायक चतुर्थी, भारतीय सौर चैत्र 8, शके 1942आजचे पंचांग
शनिवार : चैत्र शुद्ध 4, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.34, सूर्यास्त, 6.48, चंद्रोदय सकाळी 8.58, चंद्रास्त रात्री 10.10, विनायक चतुर्थी, भारतीय सौर चैत्र 8, शके 1942

दिनांक : 28 मार्च 2020 : वार : शनिवार 
आजचे दिनमान 

मेष : दैनंदिन कामे विनासायास होणार आहेत. आजचा आपला दिवस आनंदात जाणार आहे. मनोबल उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत रहाल. आनंदी व आशावादी असणार आहात. 

वृषभ : अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींचा मनोरंजनाकडे कल असणार आहे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. 

मिथुन : स्वास्थ्य व समाधान लाभेल. चिकाटी वाढेल. आरोग्य उत्तम असणार आहे. अनपेक्षित धनलाभ संभवतो. आर्थिक कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणार आहेत. 

कर्क : तुमचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायामध्ये तुमचा दबदबा राहील. दैनंदिन कामे विनासायास होतील. उत्साह व उमेद विशेष असणार आहे. हितशत्रुंवर मात करू शकाल. 

सिंह : चिकाटी वाढणार आहे. जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. कामे मार्गी लागतील. नवी दिशा सापडेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. 

कन्या : दैनंदिन कामे नकोशी होतील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल कमी असणार आहे. हितशत्रुंचा त्रास संभवतो. आर्थिक कामामध्ये अनुकूलता लाभणार आहे. 

तुळ : प्रवास सुखकर होणार आहेत. आनंदी राहू शकणार आहात. चिकाटीने कार्यरत रहाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. अनुकूलता लाभेल. 

वृश्‍चिक : दैनंदिन कामामध्ये अडचणी येणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी असणार आहे. हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

धनु : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभणार आहे. काहींची बौद्धिक परिवर्तन होईल. सकारात्मक वैचारिकता राहील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. संततिसौख्य लाभेल. 

मकर : चिकाटी वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे सकारात्मकपणे कराल. 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. प्रवासातून फायदा होणार आहे. मनोबल उत्तम राहील. 

मीन : चिकाटी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. आर्थिक व्यवहारात सुयश लाभेल. सकारात्मकता वाढणार आहे.

आजचे पंचांग
शनिवार : चैत्र शुद्ध 4, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.34, सूर्यास्त, 6.48, चंद्रोदय सकाळी 8.58, चंद्रास्त रात्री 10.10, विनायक चतुर्थी, भारतीय सौर चैत्र 8, शके 1942


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 28 March 2020