esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 जून
sakal

बोलून बातमी शोधा

rashibhavishya

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 जून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. योग्य कामासाठी खर्च कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

सिंह : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. 

तूळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात सामान्य स्थिती राहणार आहे. 

धनू : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

मकर : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

मीन : दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक क्षेत्रात काही चांगले प्रस्ताव समोर येतील. 

शनिवार : ज्येष्ठ कृष्ण 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय रात्री 2.51, चंद्रास्त दुपारी 4,04, योगिनी एकादशी, भारतीय सौर आषाढ 8, शके 1941. 

loading image