जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पंचांग 3 ऑगस्ट 2019 
शनिवार : श्रावण शुद्ध 3, चंद्रनक्षत्र मघा/पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.14, सूर्यास्त 7.09, चंद्रोदय सकाळी 8.16, चंद्रास्त रात्री 9.20, सूर्याचा आश्‍लेषा नक्षत्रप्रवेश, वाहन वेडूक, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर श्रावण 12, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

वृषभ : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित फोन व पत्र व्यवहार होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

मिथुन : सध्याचे ग्रहमान आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहे. हे ग्रहमान 15 दिवस राहणार आहे. नोकरीमध्ये यश लाभेल. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल करण्यात यशस्वी व्हाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे. 

सिंह : सध्या नकारार्थी वाटचाल राहणार आहे. कोणत्याही गोष्टीत धाडस नको. बोलण्यावर नियंत्रण हवे. 

कन्या : जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

तूळ : आगेकूच अनेक सप्ताह चालू राहील. अपेक्षेप्रमाणे कामे होणार आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. 

वृश्‍चिक : हवी ती संधी लाभणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. 

धनू : कोणच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. साडेसातीची तीव्रता वाढणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

मकर : अपेक्षित पत्र व्यवहार, फोन होतील. शैक्षणिक, नाट्य या क्षेत्रांतील व्यक्‍तींना यश लाभेल. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. 

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. विरोधकावर मात कराल. वैद्यकीय व मेडिकल क्षेत्रासाठी ग्रहमान अनुकूल आहे. 

मीन : बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. मुलामुलींची प्रगती होणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

पंचांग 3 ऑगस्ट 2019 
शनिवार : श्रावण शुद्ध 3, चंद्रनक्षत्र मघा/पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.14, सूर्यास्त 7.09, चंद्रोदय सकाळी 8.16, चंद्रास्त रात्री 9.20, सूर्याचा आश्‍लेषा नक्षत्रप्रवेश, वाहन वेडूक, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर श्रावण 12, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 3 August 2019