जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 जुलै

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 July 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 जुलै

आजचे दिनमान 
मेष : कलेच्या क्षेत्रात चांगली संधी मिळेल. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. ट्रान्स्पोर्टच्या क्षेत्रात यश लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. एखादी मानसिक चिंता व अस्वस्थता राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. 

कर्क : थोरामोठ्यांबरोबर व वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

सिंह : आर्थिक लाभ होतील. काही मित्रांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहे. 

कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य चांगले राहील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 

तूळ : सर्व क्षेत्रात आपण आघाडी घ्याल. गतिमानतेने प्रगती होईल. शासकीय कामात यश लाभेल. 

वृश्‍चिक : व्यवसायात अडचणी जाणवतील. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

धनू : मानसिक ताणतणाव राहतील. मनोरंजनावर अधिक खर्च कराल. मुलामुलींच्या संदर्भात काही नवीन समस्या निर्माण होतील. 

मकर : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात चांगल्या घटना घडतील. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. नोकरीत कटकटी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

कुंभ : विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. तुमचे छंद जोपासता येतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. 

मीन : निर्णय घेताना धाडस टाळावे. बोलण्यात व संवादात आक्रमकपणा नको. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

पंचांग
बुधवार : आषाढ शुद्ध 1, चंद्रनक्षत्र आर्द्रा-पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.04, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय सकाळी 6.17, चंद्रास्त रात्री 8, भारतीय सौर आषाढ 12, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 3 july 2019