जाणून घ्या आजते भविष्य आणि पंचांग : 7 जून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 June 2019

जाणून घ्या आजते भविष्य आणि पंचांग : 7 जून

आजचे दिनमान 
मेष : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवासात सौख्य लाभणार आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. शुभ कार्यासाठी, खरेदीसाठी दिवस प्रतिकूल आहे. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. स्पष्ट व कठोर बोलणे टाळावे. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल. 

सिंह : अडचणीवर मात कराल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक कामात यश संपादन करू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील. 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मन आनंदी व समाधानी राहील. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. 

धनू : अडचणीवर मात कराल. मनोबल वाढेल. व्यवसायात कमी-अधिक असे वातावरण राहणार आहे. 

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

कुंभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मीन : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सफलता लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

पंचांग
शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध 4/5, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय सकाळी 9.34, चंद्रास्त रात्री 11.07, भारतीय सौर ज्येष्ठ 17, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 7 June 2019