जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

दिनमान 7 डिसेंबर 2019 

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 7December 2019