जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

पंचांग 8 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941.

दिनमान 8 जानेवारी 2020 

मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. 

कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. मनोरंजनावर खर्च होणार आहे. 

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 

तूळ : व्यवसायात धाडस टाळावे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. जबाबदारी वाढणार आहे. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात अत्यंत चांगली स्थिती राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

धनू : जबाबदारी वाढणार आहे. अकारण खर्च होणार आहेत. पावल सावधगिरीने टाकावीत. 

मकर : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. शासकीय कामासाठी अजूनही थांबावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : हितशत्रुंच्या कारवायांना आळा बसेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

मीन : कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी अधिक जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

पंचांग 8 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 8 January 2020