जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पंचांग 9 डिसेंबर 2019 
सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941. 

दिनमान 9 डिसेंबर 2019 
मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. उत्साह, उमेद वाढेल. 

वृषभ : दिवस प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत दक्षता हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

कर्क : हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पार पाडाल. कणखरपणे आखलेली कामे पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय नकोत. 

सिंह : अनेक गोष्टीकरिता आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही यश व सफलता संपादन करू शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कन्या : जवळच्या लोकांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

तूळ : हाती घेतलेली कामे मनासारखी पार पडणार आहेत. व्यवसायात मनासारखे यश मिळणार आहे. मान, लौकिक, कीर्ती लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : अडचणी जाणवणार आहेत. मनासारखे यश मिळणार नाही. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. 

धनू : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. 

मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. 

कुंभ : वेगवान प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सुयश लाभणार आहे. 

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 

पंचांग 9 डिसेंबर 2019 
सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 9 December 2019