
Human Nature
sakal
निरंजन आगाशे-editor@esakal.com
व्यक्तिचित्रे आपल्याला आकर्षित करतात, ती त्या त्या व्यक्तींविषयी वाटणाऱ्या कुतूहलामुळे हे तर खरेच; पण अनेकदा ती लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयीही खूप काही सांगून जातात. लेखन, अध्यापन, साहित्यसमीक्षा या प्रांतात आपली ओळख निर्माण केलेल्या रेखा इनामदार साने यांचे ‘हृद्य’ हे पुस्तक वाचताना हे प्रकर्षाने जाणवते. याचे कारण लेखिकेचा आत्मशोधाचा प्रवास!