Human Struggle : सभ्यतेचा विस्तार: मानवाच्या संघर्षाची कहाणी

human nature and land ownership struggle story : ओलसर जमीन, झाडे आणि मानव संबंध दर्शवणारी कथा. स्त्री-पुरुष संवाद, निसर्ग, जमिनीवरील मालकी, समाजातील शक्ती-संघर्ष, चटणी तयार करण्यापासून जीवनातील शौर्य आणि मंदपणा या विषयांची सखोल मांडणी.
human nature and land ownership struggle story

human nature and land ownership struggle story

sakal

Updated on

श्‍याम मनोहर

जमीन ओलसर होती. गवत होते. झुडपे होती, काही वृक्ष होते. हवेत ऊन होते. ओलसर जमिनीवर, गवतावर, झुडपांवर, वृक्षांवर ऊन होते. सूर्य उतारावर होता. स्‍त्रीमानव व्यक्तीवर ऊन नव्हते. स्त्रीमानव व्यक्ती एका वृक्षाखाली बसली होती. स्त्रीमानव व्यक्तीने जवळचे एक छोटे झुडूप हळूवारपणे उपटले, मुळे पाहिली. स्त्रीमानव व्यक्तीने छोटे झुडूप, छोटी पाने गालाला लावली. चेहेऱ्यावरनं फिरवली, स्वतःशी हसली.

स्त्रीमानव व्यक्तीने छोटे झुडूप न्याहाळले. स्त्रीमानव व्यक्तीने जमिनीतला छोटा खड्डा नीट केला. छोटे झुडूप खड्ड्यात मुळाकडून उभे ठेवले, खड्ड्यातली माती चहूबाजूने सारली.

स्त्रीमानव व्यक्तीने पुरुषमानव व्यक्तीला संगतीने घेऊन काही झुडपे अशा प्रकारे लावली. पाऊस पडला. झुडपे तरारली. स्त्रीमानव व्यक्ती पुरुषमानव व्यक्ती हातवारे, पायवारे करत, नाजूक आवाज करत नाचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com