

Struggle of Marathi actors in Mumbai theatre
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
वामन केंद्रे... ज्या व्यक्तीच्या गावाला साधी एसटीसुद्धा जात नाही, त्या गावातून माणूस येतो आणि देशातल्या रंगभूमीच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान नव्हे, तर एक प्रकरण बनतो... ती व्यक्ती माझ्यासमोर टेबलाच्या अगदी पलीकडे तीन फुटांवर बसली होती. वामन सर जसजसे मला भेटत गेले, समजत गेले, उमगत गेले तसतसा त्यांच्याविषयीचा आदर डोळ्यांत, मनांत, उरात साठत गेला...
‘ये आत ये’ पुन्हा वामन केंद्रे सरांचा आवाज घुमला. मी दार आणखी ढकलून आत सरकलो. ‘एसी’चा गारवा अंगावर रेलू लागला. सगळे माझ्याकडेच पाहत होते. मी चोरून त्या आयताकृती केबिनवर नजर फिरवली.