समृद्धीचा ‘शाश्वत’ मार्ग

आपल्या सर्व सांस्कृतिक धारणा व्यक्ती आणि समाजाची सकारात्मक ऊर्जा वाढविणाऱ्या आहेत
independence day 2022 Cultural development
independence day 2022 Cultural development

सांस्कृतिक विकास

भारताला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. तिचा अवलंब करून आपण जीवनमान उंचावू शकतो. आपल्या सर्व सांस्कृतिक धारणा व्यक्ती आणि समाजाची सकारात्मक ऊर्जा वाढविणाऱ्या आहेत, त्या निसर्गपूरकही आहेत. संस्कृतीतील सण-समारंभ, विविध पूजा-अर्चा यांच्या माध्यमातून ऊर्जेमध्ये वाढ होत राहते. आपल्या परंपरेच्या माध्यमातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

भौतिक

लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे हा दिनक्रम शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असतो. या पार्श्वभूमीवर सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे असा दिनक्रम पुन्हा सुरू करावा

दररोज सकाळी, संध्याकाळी नामस्मरण, स्तोत्रपठण, प्रार्थना ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे मानसिक आरोग्य जपले जाते.

अंतरीचा दिवा उजळणे हे भारतीय संस्कृतीतील दिव्याचे उद्दिष्ट. त्यासाठी घरामध्ये औषधी वनस्पतींपासून बनवलेला धूप व तिळाचे तेल किंवा देशी गायीचे तूप यांचा दिवा दररोज लावणे ही आपली परंपरा आहे. गणपती ते दिवाळी हा मूलाधार चक्रापासून शिखरापर्यंतचा प्रवास म्हणजे अंतर्मनातील आतषबाजी आहे. (आणखी लेख www.esakal.com)

आपण पुन्हा एकदा घरगुती, ताजे, पौष्टिक अन्न खाण्यास प्राधान्य द्यावे.

पंचांगामध्ये उल्लेख असलेल्या पद्धतीने सण-समारंभ साजरे करायला सुरुवात करावी.

संगीत कोणते असावे याविषयी आपल्या परंपरेतील धारणा स्पष्ट आहेत. केवळ आवाज करून उत्सव साजरे करणे योग्य नाही. भूपाळीपासून भैरवीपर्यंतचे आपले संगीत आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे व म्युझिक थेरपीच्या मदतीने आजार बरे होतात, हे आधुनिक विज्ञानही सांगते. (आणखी लेख www.esakal.com)

------------------------------

भविष्यातील अपेक्षा

सध्याच्या विकासाचे परिमाण माणसाला केवळ एक उपभोग घेणारा पंचेंद्रियांचा मालक समजते.

-----------------------------

भविष्यातील अपेक्षा

भौतिक गरजा पूर्ण करायच्या, मनात नव्या गरजा निर्माण करायच्या आणि त्यासाठी उत्पादन-जाहिरात-बाजारपेठ अशी साखळी निर्माण करायची.

----------------------

भविष्यातील अपेक्षा

मोठमोठे मॉल्स, आजूबाजूला असणाऱ्या बाजारपेठा आणि ऑनलाइन मार्केट यामुळे गरज नसलेली खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे.

---------------------

भविष्यातील अपेक्षा

पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणाने, आपण हल्ली अनेकदा गरज नसताना मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, त्यामुळे घराच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण येतो.

-------------------------

भविष्यातील अपेक्षा

विद्यार्थ्यांना मदत करणे, योग्य संस्थेला देणगी देणे अशा कामात पैसा वापरण्याकडे लक्ष देणे गरजेचे.

---------------------

भविष्यातील अपेक्षा

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘माझे’ योगदान म्हणून जवळच्या कामासाठी मी वाहन वापरणार नाही, असा संकल्प करण्याची गरज.

-----------------------

भविष्यातील अपेक्षा

वाडा संस्कृतीमध्ये अनेक कुटुंबांचा एकमेकांशी कौटुंबिक जिव्हाळा, अनौपचारिक नाते होते, जे फ्लॅट संस्कृतीमध्ये लोप पावताना दिसते आहे.

---------------------------

भविष्यातील अपेक्षा

वृद्धाश्रमात राहणारे आजी-आजोबा आणि पाळणाघरातली लहान बाळे ही कौटुंबिक आनंदापासून पारखी झाली आहेत का? त्यांना घरातील हक्काचे स्थान मिळणे गरजेचे.

---------------------

भविष्यातील अपेक्षा

अंगणातील तुळस, गाय, कुत्रे, मांजर इत्यादी पाळीव प्राणी; झाडे, वेली, नद्या यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क कमी झाला आहे.

--------------

आध्यात्मिक

आपल्या देशात वर्षभर येणारे सण हे ऋतूचा व कृषी परंपरेचा विचार करून निर्माण झाले आहेत. पूजेच्या निमित्ताने फुले, पत्री वापरली जातात. यामुळे आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो. थंडीच्या दिवसांत तीळ-गूळ सेवन करणे उपयुक्त ठरते.

(वर्षभर सणवार कसे साजरे करावेत, याविषयी वाचा www.esakal.com वर)

नैसर्गिक सुगंधाचा वापर केला पाहिजे. कृत्रिम सुगंधाचा वापर टाळला पाहिजे. नैसर्गिक अत्तरे, सुवासिकांचा वापर केवळ सणावारात नव्हे, आपल्या रोजच्या जगण्यातही केला पाहिजे. घरात सुगंधी वातावरण निर्माण होण्यासाठी राळ, धूप यांचा वापर करता येऊ शकतो.

आपल्या परंपरेने सांगितलेली दिनचर्या पाळणे. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे या सवयीने आपले शरीर, मन स्वस्थ राहाते, स्वतःसाठी, व्यायाम, योग, चिंतनासाठी वेळ मिळतो.

पसायदान, मनाचे श्लोक, करुणाष्टके यांतून मनःशांती आणि बोध दोन्हीही प्राप्त होतात. अशा प्रार्थनांची ओळख रोजच्या जीवनात मुलांना करून दिली पाहिजे. नामजप, स्तोत्रे यांच्या पठणाने ताण, भीती, नैराश्य दूर होते.

भारतात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे. त्याच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि त्याचे मन, मनगट, मेंदू कार्यरत राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या परंपरेने दाखवून दिलेल्या स्वावलंबाकडे गेले पाहिजे.

--------------------

  • ३८ भारतातील पारंपरिक जागतिक पर्यटन स्थळे

  • ३७६६४ संशोधनासाठीचे शिष्यवृत्तीधारक (एप्रिल २०२१ ते जून २०२२)

  • १ लाख १७ हजार ५१० निवृत्तिवेतन आणि वैद्यकीय मदत दिलेले कलावंत (एप्रिल २०२१ ते जून २०२२)

  • ८२२१० विविध योजनांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम (एप्रिल २०२१ ते जून २०२२)

-------------------

विकासाच्या या कार्यकलापात केंद्रबिंदू आहे माणूस ! निसर्गावर मात करून, निसर्गाचा वापर करून मनुष्याने आपल्याला हव्या तशा सुविधा निर्माण केल्या. या विकासनीतीमध्ये काही लोक अत्यंत श्रीमंत होतात, तर काही दरिद्री होतात. विकासाच्या या युगात मनुष्य सुखी-समाधानी, स्वस्थ झाला आहे का? ज्या पृथ्वीच्या साह्याने तो सर्व उपभोग घेतो, ती वसुंधरा निर्मळ, जननक्षम राहिली आहे का? समृद्धीमधून काय मिळवले माणसाने?

- डॉ. रमा दत्तात्रेय गर्गे, समन्वयक, कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प. महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com