महाराष्ट्रामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळविल्यानंतर अचानकपणानं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीवर अक्षरशः बाँबच टाकला. या आघाडीचं नेतृत्व करण्याची माझी तयारी असल्याचं सांगून त्यांनी इंडिया आघाडीच्या सध्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सध्या इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. ममता बॅनर्जी यांची या आघाडीचं नेतृत्व करण्याची खूप आधीची इच्छा आहे. या आघाडीचं नेतृत्व करावं, असं त्यांना प्रारंभापासून वाटत होतं; पण दुर्दैवानं त्या वेळी तसं घडलं नाही.