Premium|AI Technology Stack : एआयच्या पाच स्तरांमध्ये भारतासाठी मोठी संधी नेमकी कुठे दडली आहे?

India AI Opportunity : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाच स्तरांच्या रचनेत भारताला विशेषतः ॲप्लिकेशन्स आणि एआय एजंट्समध्ये मोठी संधी आहे. कमी विकास खर्च, कुशल अभियंते आणि विशाल बाजारपेठ ही भारताची प्रमुख ताकद ठरू शकते.
AI Technology Stack

AI Technology Stack

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com

ॲप्लिकेशन्स आणि एजंट्सच्या स्तरावर भारताला मोठी संधी आहे. कारण इथे प्रचंड सॉफ्टवेअर इंजिनियर्स, मोठी बाजारपेठ आणि कमी विकास खर्च आहे. जसं भारतानं मोबाइल ॲप्स आणि आयटी सर्व्हिसेसमध्ये यश मिळवलं, तसं यश एआय ॲप्लिकेशन्समध्येही भारत मिळवू शकतो. थोडक्यात सांगायचं तर एआयचा हा पाच थरांचा केक पाहिला तर अमेरिका जवळजवळ प्रत्येक थरात आघाडीवर आहे. चीन काही थरांमध्ये, विशेषतः मॉडेल्स आणि ॲप्लिकेशन्समध्ये तसंच चिप्समध्ये अमेरिकेला जोरदार आव्हान देत आहे.

एनव्हिडियाचे प्रमुख जेन्सन हुआंग अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उद्योगाला ‘पाच लेअर्सचा केक’ किंवा ‘एआय स्टॅक’ म्हणून समजावतात. ही कल्पना खूप उपयोगी आहे, कारण एआय म्हणजे फक्त ‘चॅटजीपीटी’ किंवा एखादा ‘चॅटबॉट’ नाही. त्यामागे चिप्सपासून ते अंतिम वापरकर्त्यापर्यंत अनेक थर असतात. एखाद्या मोठ्या लग्नाच्या केकप्रमाणे खालचा थर मजबूत नसेल तर वरचे सुंदर थर उभेच राहू शकत नाहीत.

सगळ्यात खालचा थर म्हणजे चिप्स. ‘एआय’ची खरी ताकद इथे असते. पूर्वी संगणकांमध्ये सीपीयूज (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स) महत्त्वाचे होते, पण ‘एआय’साठी ‘जीपीयूज’ (ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स) अधिक उपयुक्त ठरले कारण ते अतिशय जलद आणि समांतर तऱ्हेनं प्रोसेसिंग आणि मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन्स करू शकतात. त्यांची गरज ‘एआय’च्या ‘चॅटजीपीटी’ सारख्या मॉडेल्सना लागते. आज एनव्हिडिया ही अमेरिकन कंपनी या क्षेत्रात जवळजवळ मोनॉपोली मानली जाते. तिचे एच हंड्रेड, बी हंड्रेड आणि इतर जीपीयूज जगभरातल्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देतात. पण ती एकटी नाही. एएमडी, इंटेल आणि गुगल यांच्या चिप्स, तसंच चीनमध्ये हुवावे आणि कॅम्ब्रीकॉन यांच्यासारख्या कंपन्या अमेरिकन निर्बंधांनंतर स्वतःची ‘एआय’ चिप्स विकसित करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com