टपाल खात्यात हजारहून अधिक जागांसाठी भरती! 

टीम ई सकाळ
Tuesday, 11 June 2019

भारतीय टपाल खात्यामध्ये 1,735 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड या तीन विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यात ग्रामीण डाक सेवक, सहायक शाखा पोस्टमास्टर अशा जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै आहे.

करिअर : भारतीय टपाल खात्यामध्ये 1,735 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड या तीन विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यात ग्रामीण डाक सेवक, सहायक शाखा पोस्टमास्टर अशा जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै आहे. 

शैक्षणिक पात्रता
इच्छुक उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. 

इतर महत्त्वाची माहिती 

  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे 
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी वयोमर्यादेत अनुक्रमे पाच आणि तीन वर्षांची सूट 
  • एक उमेदवार जास्तीत जास्त 20 जागांसाठी अर्ज करू शकतो 

अर्ज करण्याची फी 
या पदासाठी अर्ज करण्याची फी 100 रुपये आहे. कोणत्याही महिला उमेदवारास ही फी लागू होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Post Recruitment 2019 All you need to know about