
नरेश शेळके - naresh.shelke@esakal.com
दक्षिण कोरियाचे औद्योगिक शहर असलेल्या गुमी येथे आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. यात काही जुन्या व अनुभवी चेहऱ्यांनी पदकावर नाव कोरले. त्याचप्रमाणे काही नवीन चेहऱ्यांनी पदकांवर नाव कोरताना आपण भविष्यातील भारताचे आशास्थान आहोत, असे संकेत दिले. भारतीय ॲथलिट्सने २४ पदके जिंकून पदकतालिकेत चीनपाठोपाठ दुसरे स्थान मिळवले असले तरी या ॲथलिट्सची खरी कसोटी पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत लागेल, हे विसरून चालणार नाही.