Indian Chintz : विणकरांच्या पाठीवरचे वळ

Indian Textile : सतराव्या शतकात भारतीय चिंट्झने युरोपची बाजारपेठ काबीज केली होती. कोरोमंडल किनाऱ्यावरील कारागिरांनी युरोपीय मागणीनुसार हाताने रंगवलेली कापडे आणि आकर्षक डिझाईन्स तयार केली.
Indian Chintz

Indian Chintz

esakal

Updated on

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

भारतीय चिंट्झच्या कापडाचा उज्ज्वल इतिहास गेल्या लेखात आपण जाणून घेतला. भारताच्या दक्षिणेकडच्या कोरोमंडल किनाऱ्यावर अशी एक अद्वितीय वस्त्रकला अस्तित्वात होती की जिने सतराव्या शतकात पूर्ण युरोपची बाजारपेठ काबीज केली होती. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, हॉलंड, सारे पश्चिम युरोपमधले दर्यावर्दी, वसाहतवादी देश भारतीय चिंट्झच्या शोधात भारतात येऊ लागले होते. भारतीय वस्त्रकलेला ही जगाने दिलेली पावती होती. चिंट्झ बनवणारे भारतीय कलाकार कलेत इतके निष्णात होते की युरोपीय मागणीनुसार ते कापड बनवून देत असत, तेही हाताने रंगवून, किंवा अगदी अल्पकाळात युरोपियन लोकांना हवे तशा डिझाईनचे लाकडी ब्लॉक्स बनवून. आज बिझनेस स्कूल्समध्ये मार्केट फोर्सेस, सप्लाय आणि डिमांड, कस्टमर सॅटिसफॅक्शन वगैरे मोठमोठे शब्द वापरून जे शिकवले जाते ते सगळे भारतीय वस्त्र कारागिरांना सतराव्या शतकात माहिती होते, नव्हे, ते सगळे ते आचरणात आणत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com