

Indian Chintz Fabric
esakal
शेफाली वैद्य - saptrang@esakal.com
भारतात आलेल्या पहिल्या युरोपियन व्यापाऱ्यांनी, म्हणजे पोर्तुगीजांनी या कापडाला त्यांच्या भाषेत ‘पिंतादो’ असे नाव दिले. पिंतादो म्हणजे रंगवलेले. हे कापड केरळमधल्या कालिकत ह्या बंदरातून युरोपला मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असे, म्हणून त्याला कॅलिकोचे कापड असेही म्हणत. पण ह्या चिंट्झच्या कापडात असे काय होते, ज्यामुळे युरोपीय देशांना ह्या कापडाच्या आयातीविरुद्ध कायदे करावे लागले.
जुन्या मराठी साहित्यात ‘चिटाचा परकर पोलका’ हा उल्लेख हमखास येत असे, पण हे चिट म्हणजे काय हे जाणून घेतले तर आपल्या लक्षात येईल की हे साधे कापड नव्हते. अठराव्या शतकात ह्या भारतीय कापडाने पूर्ण युरोप खंडाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली होती. हे विधान अतिशयोक्त वाटतंय? पण चिट म्हणजेच भारतीय चिंट्झचा इतिहास जाणून घेतला तर आपल्या लक्षात येईल, की हे कापड एकेकाळी भारताची ओळख होतं. इंग्रजी भाषेमध्ये चिंट्झ हा शब्द आला तोच मुळी हिंदीतील छिंट ह्या शब्दावरून. अगदी आजही हिंदीत छिंट म्हणजे शिंतोडा किंवा ठिपका. हिंदीत हा शब्द आला तो संस्कृत भाषेतील चित्र ह्या शब्दावरून. भारतात आलेल्या पहिल्या युरोपिअन व्यापाऱ्यांनी, म्हणजे पोर्तुगीजांनी या कापडाला त्यांच्या भाषेत ‘पिंतादो’ असे नाव दिले. पिंतादो म्हणजे रंगवलेले. हे कापड केरळमधल्या कालिकत ह्या बंदरातून युरोपला मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असे म्हणून त्याला कॅलिकोचे कापड असेही म्हणत. पण ह्या चिंट्झच्या कापडात असे काय होते ज्यामुळे युरोपीय देशांना ह्या कापडाच्या आयातीविरुद्ध कायदे करावे लागले, हा इतिहास जाणून घेणे फार उद्बोधक आहे.